Raj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
Maharastra Politics: मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे.
Raj Thackeray On BMC Election: काही दिवसांपूर्वी गटाध्यक्षांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं होतं. निवडणुका कधीही लागो... तुम्ही तयारीला लागा, असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला होता. त्यानंतर मनसे भाजपसोबत युती करणार की नाही?, असा सवाल उपस्थित होत असतानाच राज ठाकरे (Raj Thackeray On BMC Election) यांनी पुन्हा मोठी घोषणा केली आहे. (MNS chief Raj Thackeray Big announcement On BMC Election marathi news)
मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे. मी माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी (Maharastra Politics) काम करतो, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) देखील निशाणा साधला आहे.
कोणाच्याही आरोग्याबद्दल सुधारणा व्हावी. मुख्यमंत्री असताना भेटी तुम्ही टाळत होता. आता बरं भेटी होतात. अचानक कसे दौरे सुरू झाले? एकंदरीत प्रकृतीची चेष्टा नव्हती ही परिस्थितीची चर्चा होती, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर (Raj Thackeray On Uddhav Thackeray) केली.
दरम्यान, राज्यपालांना (Bhagat singh Koshyari) कोणीतरी स्क्रिप देतं का? अशी शंका देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली. पदावर असल्याने कोश्यारींना सोडून देतोय, असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. सीमावादाचा प्रश्न मधेच कुढून वरती येतो?, आपलं लक्ष वळवायचंय का? न्यायालय जो निर्णय देईल तो देईल, असं म्हणत राज्यपालांच्या सीमावादाच्या विषयावर राज ठाकरेंनी पाणी सोडलं.