Narayan Rane: 'आदित्य ठाकरे हे तर पिल्लू, राहुल गांधी कानात म्हणाले...'; राणेंची शेलक्या शब्दात टीका!

Maharastra Politics: सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी परखड भूमिका घेतली आहे, असं राणे म्हणाले.

Updated: Nov 29, 2022, 05:46 PM IST
Narayan Rane: 'आदित्य ठाकरे हे तर पिल्लू, राहुल गांधी कानात म्हणाले...'; राणेंची शेलक्या शब्दात टीका! title=
Narayan Rane

Narayan Rane On Aditya Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी (Maharastra Politics) घडताना दिसत आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्ष तयारीला लागल्याचं दिसतंय. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाण्यात सभा घेत शिंदे गट आणि भाजपवर तोफ डागली. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले Narayan Rane?

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बुलढाण्यात अगदीच मुळमूळीत भाषण केलं. त्यावेळी सावरकरांबाबत उद्धव ठाकरे का बोलले नाहीत? ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींची (Rahul Gandhi) आदित्य ठाकरे गळाभेट घेतात! आदित्य ठाकरे हे तर पिल्लू आहे. मला वाटतं राहुल गांधींना मिठी मारल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) त्यांच्या कानात वेल डन म्हणाले असतील, असं उपरोधिक टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

सावरकरांबाबत जे वक्तव्य राहुल गांधींनी केलंय, त्यावर ठाकरेंनी राहुल गांधींचं कौतूक केलं असेल, असं नारायण राणे म्हणाले आहेत. सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी परखड भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील एक इंच जागा देखील कुठं जाणार नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात जे उद्योगधंदे गेले, त्यावर तर कोण बोलत नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आणखी वाचा - Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले

दरम्यान, तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून होता, त्यात तुम्ही फक्त अडीत तासच खुर्चीवर बसला होता, असं म्हणत त्यांनी टीकेचे बाण देखील सोडलेत. उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का?, असा थेट प्रश्न त्यांनी (Narayan Rane) विचारला आहे.