Raj Thakceray On Lockdown | `लॉकडाऊन आवडे सरकारला`, राज ठाकरेंची सरकारवर टीका
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (mns chief raj thackeray) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
पुणे : राज्य शासनाकडून वारंवार लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला घाबरून आतापासूनच घरात बसायचं का? यांना काय जातं लॉकडाऊन करायला, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच लॉकडाऊन आवडे सरकारला अशा शब्दांत राज ठाकरेंनी टोला लगावला. (mns chief raj thackeray criticize to maharashtra government over to lockdown restrictions) राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची पुण्यात भेट घेतली. यावेळस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राज ठाकरे काय म्हणाले ?
कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून काय आतपासूनच घाबरुन घरात बसायचं,ही कुठली पद्धत झाली, असं म्हणत राज यांनी सरकारला धारेवर धरलं.
"लोकांचे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. घर-संसार कसा चालवायचा हे कळत नाहीये, मुलांच्या फी कशा भरायचा, हे माहिती नाही", अशा प्रकारे राज ठाकरेंनी सर्वसामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
"यांना लॉकडाऊन करायला काय जातंय. लॉकडाऊन करायचा अन् यांना कोणी प्रश्न विचाराचा नाही", असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. तसेच पी साईनाथ यांच्या पुस्तकाच्या नावाचा संदर्भ घेत सरकारवर लॉकडाऊनवरुन टीका केली. पी साईनाथ यांच्या 'दुष्काळ आवडे सर्वांना' या पुस्तकाप्रमाणे, 'लॉकडाऊन आवडे सरकारला', अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.
लसवंतांना लोकल प्रवास का नाही?
कोरोनाचे दोन डोस झालेल्यांना लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी का दिली जात नाही, असा सवाल मनसेप्रमुखांनी यावेळेस उपस्थित केला. तसेच या प्रकारची सर्व आडकाठी ही फक्त महाराष्ट्रातच का, बाकीच्या राज्यात सर्व काही सुरळित सुरु आहे.