`...हे अद्भूत आणि विचित्र ,` पुण्यातील स्थिती पाहिल्यानंतर राज ठाकरे संतापले, `दिसली जमीन की विक हा एकच उद्योग...`
Raj Thackeray on Pune Flood Situation; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी तेथील नागरिकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी शहर नियोजन (Town Planning) केलं जात नसल्याने संताप व्यक्त केला.
Raj Thackeray on Pune Flood Situation; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी तेथील नागरिकांशी संवादही साधला होता. पाणी सोडताना फार लवकर सांगायला हवं होतं असं मत त्यांनी प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना म्हटलं. इतकं पाणी सोडलं जाईल याची लोकांनाही कल्पना नव्हती. यावेळी त्यांनी शहर नियोजन (Town Planning) केलं जात नसल्याने संताप व्यक्त केला. तसंच सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असंही म्हटलं आहे.
"मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुण्याला वेळ लागणार नाही. हे सगळं त्याचंच चित्र आहे. सरकारकडून विकासाची योजना येते, पण टाऊन प्लानिंग नावाची काय गोष्टच दिसत नाही आहे. किती गाड्या य़ेतात, त्या पार्क कशा होणार? लोक जाणार कसे? टाऊन प्लानिंग करताना किमान हजार लोकांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या केल्या जात नाहीत. शाळा, हॉस्पिटल, बागा असाव्या लागतात. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरांमध्ये राबवल्या जात नाही. दिसली जमीन की विक इतका एकच उद्योग सुरु आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत
"आज पुण्यात पाच शहरं झाली आहेत. मुंबईत लोखंडवाला कॉम्लेक्स झालं तेव्हा वेगळी मुंबई झाली असं वाटलं. पण पुण्यात जितक्या कमी कालावधीत या घटना घडल्या हे अदभूत आणि विचित्र आहे. पुणे शहर कुठपर्यंत पसरत झालं आहे. गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीये. नगरसेवक नसल्याने जबाददारी घेणार कोण? प्रशासनाने बोलायचं कोणी? त्यामुळे ही जबाबदारी प्रशासनाची आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं.
"या राज्यात बाहेरु येणाऱ्यांना फुकट घर देता आणि इथले लोक भीक मागत आहेत. याला काय सरकार चालवणं म्हणतात का? बाहेरुन आलेली मुलं या राज्याची होतात आणि आमची मुलं कोट्यातून प्रवेश मागत आहेत. राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? महाराष्ट्राचा कोणी विचार कऱणार आहे की नाही? मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बाहेरुन येणारे फुकट घऱ घेऊन जात आहेत आणि येथील स्वत:च्या कष्टाचे पैसे घालणारे लोक वाऱ्यावर आहेत, जे या राज्याचे मालक आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारच्या खात्याची आणि पालिकेची ही संबंधित जबाबदारी आहे. पनवेल आणि ठाण्यावरुन साफसफाईसाठी लोक आणावी लागतात हे लाजिरवाणं आहे. तुम्हाला बाहरेच्या महापालिकांकडे सफाईसाठी लोक मागावे लागतात अशी खंतही त्यांनी मांडली. निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत. मी काल ज्यांना भेटलो त्यांच्या अंगावर फक्त एक कपडा होता. रोगराई वाढली कर कोण पाहणार? राज्य सरकारला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लक्ष घालावं लागणार आहे असंही ते म्हणाले.
"एखाद्या शहरात अनेक संस्था काम करत असतात. या सगळ्या संस्था यांची एकत्रित बैठक होत नाही का? टेंडर निघाले की पैसे काढता येतात, यामुळे चांगले रस्ते, फुटपाथ मिळत नाहीत. या शहरातील नगरसेवकांनी नीट लक्ष दिलं पाहिजे. यांच्या बैठका होणार नसतील तर तर बर्बाद होणार," असं त्यांनी सांगितलं. एका महिलेला भेटलो, जिच्या पोटचा मुलगा गेला होता. जे तिला कळतं ते प्रशासनला कळत नाही का? त्या महिलेच्या पोटचा मुलगा गेला आहे. अन् त्यानंरही हिंमतीने बोलत होत्या याचं आश्चर्य वाटलं. एखादा प्रकल्प आणताता सर्वांना विचारुन का आणत नाही? मनात आला म्हणून लगेच प्रकल्प आणता. पत्रकार, नागरिकांशी काही बोलत का नाही? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.