मुंबईत पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री; मनसेचा राडा
मुंबईतील BKCमध्ये मनसैनिकांनी राडा घातला. पाकिस्तानी क्रिकेट संघाशी संबंधित वस्तूंची विक्री करणा-या, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीच्या फॅनकोड ऍपच्या कार्यालयावर मनसेनं धडक दिली. एकीकडे
pakistani flag in mumbai : मुंबईत पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील कुर्ला BKC परिसरात असलेल्या एका स्पोर्ट्स वेअर अॅपच्या कार्यालयामार्फत पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री केली जात होती. हा सर्व प्रकार मनसेने उघडकीस आणला असून अॅपच्या कार्यालयात मनसेने राडा घातला.
स्पोर्टा टेक्नॉलॉजीसच्या फॅनकोड अॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी क्रिकेट संघ व पाकिस्तानी झेंड्याशी निगडीत वस्तूंची भारतीय बाजारात केली जात होती. पाकिस्तानी झेंडे आणि जर्सीची विक्री केल्याप्रकरणी पोर्टा टेक्नॉलॉजीसच्या फॅनकोड अॅपच्या कार्यालयात मनसेने गोंधळ घातला.
मनसे कामगार सेना सरचिटणीस संतोष धुरी, विभाग अध्यक्ष सुनील हर्षे आणि मनसे कामगार सेना उपाध्यक्ष केतन नाईक यांनी बी.के.सी येथील कार्यालयात धडक देत जाब विचारला. पाकिस्तानी जर्सी विकत घेणाऱ्या पाक धार्जिण्या अवलदींची नावे जाहीर करा अशी मागणी केतन नाईक यांनी केली.
एकीकडे वैष्णवदेवी येथे जाणाऱ्या भाविकांवर पाक पुरस्कृत अतिरेकी हल्ला करत आहेत आणि या कंपन्या भरतात पाकिस्तानच्या क्रिकेट जर्सी विकत आहेत.लाज वाटते का? असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला.
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची एकमताने निवड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली. 2023 ते 2028 या कालावधीसाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची एकमताने निवड झाली आहे. नसेच्या पक्षांतर्गत निवडणुकी साठी मनसे पदाधिकारी, नेते माटुंग्यातल्या कल्चरल सेंटरला पोहोचले होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षानंतर अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागते त्या दृष्टीने आजची ही मनसेची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे मनसेचे संकेत
आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मनसेकडून मिळालेत.. विधानसभेच्या 200 ते 250 जागांची तयारी सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळतेय. राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलं नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. जुलै महिन्यात राज्याचा दौराही राज ठाकरे करणारेत.