रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार इथं होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी संदर्भात मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभवडे गावात प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांची बाजू जाऊन घेण्याचा नांदगावकरांनी प्रयत्न केला. या संदर्भातील अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात येईल आणि त्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. 


तसंच जानेवारी किंवा फेब्रुवारी स्वतः राज ठाकरे यांचा या भागात दौरा होईल असंही ते म्हणालेत. भूमीपुत्रांच्या हक्कांवर गदा आणून विकास नको असल्याची भूमिका मनसेची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय.