पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्या विरोधात भूमिका (Hanuman Chalisa controversy) घेणारे मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी शनिवारी त्यांच्या भागात महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर काल वसंत मोरे यांनी पुण्यात राज ठाकरे यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आपली अडचण झाल्याचे मोरे यांनी म्हटलं होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने पुण्यात महाआरतीचं आयोजन केलं होतं. याला वसंत मोरे उपस्थित होते. पण राज ठाकरे पुण्यात असतानाही महाआरतीला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. 


या चर्चा रंगत असतानाच वसंत मोर यांनी महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजेरी लावली. वसंत मोरे यांनी स्वत: याबाबतची माहिती आणि फोटो आपल्या फेसबूकवर शेअर केले आहेत. 



मनसे वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेजभाई शेख यांच्या घरी त्यांनी जेवण केलं असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुनीर अंधारे, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष अमित जगताप, शाखा अध्यक्ष मंगेश रासकर हे सुद्धा उपस्थित होते.