Pune News : पुण्यात मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) पुन्हा आक्रमक झालेत. अल्पवयीन मुलींना एनजीओच्या ऑफिसमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करणारा पुणे आरपीएफचा कर्मचारी अनिल पवार हा गुन्हा दाखल होऊन महिना होता आला तरी फरार आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी एनजीओच्या कार्यालयाची तोडफोड (Vasant More Demolished Office) केली. रेल्वे स्टेशन परिसरात एका इमारतीमध्ये हे एनजीओ कार्यालय आहे. आरोप अनिल पवार आणि त्याचा साथीदार कमलेश तिवारी यांनी एका अल्पवयीन मुलीवर सलग पाच दिवस याच इमारतीमध्ये बलात्कार केला. रक्षकच भक्षक बनल्याचं हे संताप जनक प्रकरण आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी वसंत मोरे यांनी एनजीओच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे पुढे राहणार नाही, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे. आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अजूनही आरोपी सापडत नाही. आरोपीला ट्रेस करू शकत नाही. तुम्ही त्याला पळायला संधी देताय, असं म्हणत वसंत मोरे यांनी खळखट्याक केलाय.


पाहा Video




अमित ठाकरे यांचा पुणे दौरा


पुणे लोकसभेसाठी मनसेची तयारी चालू असल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आज आणि उद्या पुण्यात घेणार प्रभाग निहाय आढावा बैठक घेतील, अशी माहिती देण्यात आली होती. अमित ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी देखील बैठका घेणार आहेत. पुणे लोकसभेची जबाबदारी मनसे कडून अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे उद्या पक्ष कार्यालयात बैठका घेणार आहेत. 


मुंबईत कुलगुरूंना घेराव 


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई विद्यापीठात कुलगुरूंना घेराव घातला होता आणि आंदोलन केलं होतं. सिनेट निवडणुकीत सुरू असलेल्या गोंधळाबाबत मनसेने काल आंदोलन केलं होतं. मात्र ज्या पद्धतीने कुलगुरू यांना घेराव घातला आणि आंदोलन केलं त्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मुंबई विद्यापीठ इथे निषेध केला आहे .मनसेने योग्य पद्धतीने त्यांचे मुद्दे उपस्थित करावे गुंडागर्दी करू नये असं अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मांडली आहे.