`मलाही ऑफर आल्या होत्या`, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, म्हणाले `इथंच मारीन...`
Raj Thackeray on Toll: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला आहे. `टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता हवी,` असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Raj Thackeray on Toll: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला आहे. माझा विरोध टोल नाही तर टोलवसुलीला आहे हे स्पष्ट करताना टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता हवी असं राज ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान टोलच्या मुद्द्यावर आपण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"माझा टोलला विरोध नाही. टोलवसुलीसाठी रोख रक्कम घेतली जाते त्याचा हिशोब पारदर्शी नाही त्याला विरोध आहे. किती गाड्या जातात, किती पैसे जमा होतात, सरकारला किती पैसा जातो यात पारदर्शकता नाही. टोल हा जनरल असतो. पण विषय टोल नसून टोलवसुली आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'
"मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे सुरु होऊन इतकी वर्षं झाली मग इतक्या वर्षात पैसे वसूल झालेत की नाही. याची उत्तरं मिळणार की नाही? मी मुख्यमंत्र्यांना उद्या भेटणार आहे. आम्ही टोलनाक्यांवर गेलो असता जी आकडेवारी दिसली ती त्यांच्यासमोर ठेवणार आहे," अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
"मी पैसे देत आहे, तर ते सरकारला गेले पाहिजेत. त्यातून सरकार नव्या योजना करु शकेल. पण ते टोलवाल्याच्या खिशात जास्त असतील तर मला आवडणार नाही. त्या पैशांचा वापर राजकीय पक्षासाठी केला जात असेल तर तुम्हाला आव़डेल का? पारदर्शकता नसेल तर त्याला विरोध करायला नको का?," अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.
'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा
"रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्र, खड्डे याबाबत दिलेल्या आश्वासनाचं काय झालं. टोलनाक्यावरुन पुढे गेल्यावर खड्डे असतील तर मी टोल कशासाठी भरला हे मला कळू तर दे. कोकणातला रस्ता पूर्ण नाही, पण टोल लावतात याचा अर्थ काय. ट्रान्सहार्बर लिंकवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं आहे, ते सगळ्या टोलनाक्यांवर वापरा. पण इतकी वर्षं सुरु असून यात काळंबेरं आहे हे लक्षात येत नाही का? टोलचा महसूल राज्य सरकारच्या किती आणि खासगी व्यक्तीच्या खिशात किती जातो हे तपासायला नको का?," असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान राजकीय पक्षांच्या निधीसाठी हे पैसे वापरले जात असल्यासंबंधीच्या डेटासंबंधी विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी मलाही ऑफर आल्या होत्या असा गौप्यस्फोट केला. "मलाही ऑफर आल्या नव्हत्या असं वाटतं का? जे आले होते त्यांना इथंच मारीन असं म्हटलं होतं. परत टोलवर जाताही येणार नाही".