Dhairyasheel Mohite Patil :  माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकासआघाडीचे राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गटाचे उमेदवार आहेत.  काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. ते आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी लढणार, असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी चर्चते आलेय ती त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर एकाच जिल्ह्यात एकाच पोलिस ठाण्यात तब्बल 31 गुन्हे दाखल आहेत. यांचे खटले न्यायालयात सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावेळी मोहिते पाटलांमुळं माढ्यामध्ये भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दीड लाखांचं मताधिक्य मिळालं होतं. आता रणजितसिंहांच्या विरोधात मोहितेंनी बंडाचं निशाण फडकवलंय. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माढामध्ये हा प्रवेश सोहळा झाला. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहितेंना माढाची उमेदवारी मिळाली आहे. 


धैर्यशील मोहिते पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे खळबळ


धैर्यशील मोहिते पाटील यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे खळबळ उडाली आहे. तर अनेकांनी त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर एक-दोन नव्हे तर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गुंडगिरी, फसवणूक यासारखे असे हे गंभीर गुन्हे आहेत. एवढे गुन्हे दाखल असताना उमेदवारी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टत महत्वाची सुनावणी


लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टत महत्वाची सुनावणी होणारेय. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या लोकप्रतिनिधींना दिलासा मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, अदिती तटकरे, यांच्यासह आजी-माजी 20 खासदार-आमदारांविरोधातील खटले राज्य सरकारनं मागे घेतलेत. तर आणखी 17 लोकप्रतिनिधींविरोधातले खटलेही मागे घेणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय. 


माढामध्ये महाविकास आघाडीला धक्का


माढामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मविआचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून सचिन देशमुख यांनी माढातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कालपर्यंत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख इथून उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र काल बारामतीमध्ये अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्यांच्याऐवजी ऍडव्होकेट सचिन देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला.