शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?
बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे.
बीड : बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. मात्र, हे पैसे कोणी आणि का बॅंक खात्यात जमा केले, याची माहिती नसल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांच्या खात्यात 500, 1000, 2000 रुपये जमा झाले आहेत. मात्र हे पैसे कुठून जमा झाले, कोणी जमा केले याची माहिती अद्याप या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान, बॅंक खात्यावर जमा झालेली रक्कम बीड एनआयसीच्या नावे असल्याचे दिसून येत आहे.
मात्र हे पैसे कशाचे आहेत. हे कोणालाही समजलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बॅंक खात्यावर १५ लाख रुपये जमा होतील, असे जाहीर म्हटले होते. मात्र ते आजपर्यंत जमा झाले नाहीत. त्यामुळे अचानक धनलाभ झाल्याने बीडचे शेतकरी चर्चेत आले आहेत.