मुंबई : बंगालच्या उपसागरातल्या असनी चक्रीवादळाने मान्सूनची वाट सोपी केली आहे. असनी चक्रीवादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंदमानात मान्सून 17 मेपर्यंत तर केरळात 28 मेपर्यंत पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे. आज या चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे. त्यामुळे कोकणात बुधवारी आणि गुरूवारी तर मध्य महाराष्ट्रात गुरूवार आणि शुक्रवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



या चक्रीवादळाचा थेट मान्सूनशी संबंध नाही. पण हे वादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल. त्यामुळे मान्सूनचे वारे त्या दिशेने लवकर येतील.