पुणे : हवामान खात्याच्या वेगवेगळ्या वेध शाळा वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असल्यामुळं राज्यात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा वेधशाळेनं सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस येणार आहे. 


तर पुणे वेधशाळेनं थेट १६ जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्य़ात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमका कोणाचा अंदाज खरा मानायचा असा संभ्रम शेतक-य़ांमध्ये निर्माण झाला आहे. 


हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवून बळीराजा खरीपाचं नियोजन करतो. मात्र गेल्या १५ दिवसांत हवामान खात्याचा एकही अंदाज खरा ठरलेला दिसून येत नाही. त्यामुळं वेधशाळांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.