मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचं उशीरा आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. राज्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आ्रहे. मान्सूनचं आगमन अंदमानात झालं असलं तरी त्याची पुढची वाटचाल मंदगतीनं राहणार आहे. केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरच मान्सून येण्याची शक्यता असल्यानं राज्यात किमान ८ जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात येतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील असा अंदाज आहे. मात्र १ जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.