प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : मान्सून दोन दिवसांत कोकणात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याआधी राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी कोल्हापूरात मुसळधार पाऊस झाला. पण काही वेळासाठी पडलेल्या पावसाने कोल्हापूर महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी संध्याकाळी पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसातच कोल्हापूरची अवस्था बिकट झाली. शहरातील अनेक सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी शिरलं तर मोठी झाडं उन्मळून पडली . याला सर्वस्वी कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याची टीका कोल्हापूर शहरातील नागरिकांनी केली आहे.


29 मिनिटात तब्बल 15.8 मिलिटर पावसाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून पावसाचे आगमन होण्याआधीच वळवाच्या पावसाने गुरुवारी कोल्हापूर शहराची दणादाण उडवली. शहरात ढगफुटी सदृश पावसाने कहर केला. 29 मिनिटात तब्बल 15.8 मिलिटर पावसाची नोंद झालीय. ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने सुसाट्याचा वाऱ्यामूळ अनेक घरावरील पत्र उडून गेले तर काही ठिकाणी अनेक झाडे उन्मळून पडली.अनेक भागाला तळ्याच स्वरूप प्राप्त झालं होतं होत. कोल्हापूर शहर तरी पूर्णपणे तुंबल होत.


नालेसफाईच्या कामासाठी 25 लाख खर्च केले ? 
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील नाल्याची सफाई केली. नालेसफाईच्या कामासाठी महानगरपालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. मग हा निधी गेला कुठे असा सवाल कोल्हापुरातील नागरिक आणि विरोधक विचारत आहेत. महापालिकेच्या कारभारामुळे भविष्यात पुरस्थितिला तोंड देण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त होत आहे.