Pune Braces For Heavy Rainfall : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवेळी पुणे शहर आणि तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  पुढील 4-5 दिवश मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.  पुण्यासाठी हवामान विभागाने एलो अलर्ट जारी केला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होईल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.


पुणेकरांना पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या नऊ तासांत पाऊस सातत्याने वाढत आहे आणि तो कायम राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी, IMD पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी एलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याची आणि पुढील 4-5 दिवसांसाठी सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा


 


जोरदार पाऊस होणार असल्याने लोकांना रस्त्यांवरुन प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे रस्ता दिसणार नाही. तसेच रस्ता निसरडा होईल, असा परिस्थिती वाहन चालवताना धोका होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांबाबत वाहनचालकांना सावकाश वाहन चालण्याचे आणि खड्डे लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता


हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत लगतच्या घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाटमाथा  परिसरात आणि या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, घाट भागात 30-35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपून काढले; पुढचे 48 तास महत्त्वाचे, ऑरेंज अलर्ट जारी


नागरिकांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडताना काळजी घ्या. घाट परिसात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  पावसाळ्याचा आनंद घेताना, प्रतिकूल हवामानात सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहर आणि तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.