Monsoon Upcates : यंदाच्या आठवड्याअखेर पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण, तेव्हा मात्र पावसानं दडी मारली. अखेर आठवड्याची सुरुवात मात्र पावसाच्या दमदार हजेरीनं झाली. (Monsoon updates Konkan maharashtra vidarbha rain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड लागतच्या कातरवाडी शिवारात सोमवारी संध्याकाळी पावसाने धुव्वाधार बॅटींग केली. मुसळधार पावसाने कातरवाडी-रापली दरम्यानचा पाझर तलाव भरल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. तर पावसामुळे कात्रा डोंगरावरून धबधबा वाहायला सुरवात झाली. 


वाशिम जिल्ह्यात 4 दिवसांच्या खंडानंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. यामुळे खोंळबलेल्या पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 


दोन दिवसांनंतर भंडारा जिल्ह्यात पाऊस 
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली. साधारण तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला. तिथे हिंगोलीतही मुसळधार पावसानं हजेरी लावली. 


गावांचा संपर्क तुटला 
मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. परडी, माटेगाव, खापरवाडी, देवगाव, लवूळ, काडीवडगाव इथं दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पहिल्याच पावसाने नदीवरील पूल वाहून गेला. प्रशासानानं पावसाळापूर्व कामं वेळेत न केल्यानंच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होतोय.