पुणे : Congress OBC Cell Morcha : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या ओबीसी सेलने पुण्यात (Congress OBC Cell Morcha in Pune) आज मोर्चा काढला. मात्र या मोर्चादरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात झाली. मात्र मोर्चा सुरू होताच समता परिषदेचे मृणाल ढोले यांनी मोर्चाला काळे झेंडे दाखवले आणि घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा गोंधळ झाला आणि राडा पाहायला मिळाला. यावेळी संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले यांना मारहाण केली. (Morcha of Congress OBC cell in Pune, Fight between Congress workers and Mrinal Dhole)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसीचे आरक्षण हे निवडणुका घेण्यापूर्वी मिळायला हवे, अशी प्रमुख मागणी आहे. यावेळी एक जातीयवादी माणूस या मोर्चात घुसला. त्याने ओबीसी आरक्षण मिळणार नाही असे म्हटले. त्याने काळा कपडा बाहेर काढला. कितीही घोषणा दिल्या तरी तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, असे तो बोलला. त्यावेळी मोर्चातील लोकांनी त्याला चांगलेच चोपले, अशी माहिती मोर्चात सहभागी झालेल्यांनी दिली. 



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, या मोर्चाला पोलिसानी परवानगी नाकारली होती. तहीरी शहरात मोर्चा काढण्यात आला.