नांदेड शहराजवळ नेरली गावात दोनशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री गावातील अनेकांना उलट्या आणि डोकेदुखी सुरू झाली.  मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमधील या घटनेवरुन पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना अचानक शुक्रवारी मध्यरात्री उलटी, जुलाब, डोके दुखणे, चक्कर येऊ लागले. सुरवातीला काही नागरिकांना त्रास झाला. अचानक त्रास का झाला हा प्रश्न नागरिकांना पडला. यानंतर अनेकांनी या प्रकारच्या त्रासाची तक्रार केली. अचानक आजारी नागरिकांची संख्या वाढू लागली. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर झाली आहे. 


शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजल्यापासून रुग्णांना नांदेड शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा आरोग्य डॉक्टरांच्या टीम नेरली कुष्ठधाम गावात तळ ठोकून आहे.  रुग्णांची तपासणी सुरु असून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे. शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास पावणे दोनशे रुग्णांना रुग्णालयात भरती केलं आहे. यामध्ये पंधरागून अधिक लहान मुलांचा समावेश आहे. 


घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली या गावात दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. त्याचे कारण म्हणजे. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री गावातील अनेकांना उलट्या आणि डोकेदुखी त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  नंतर मात्र हा प्रकार वाढतच गेला