Ajit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!
Ajit Pawar announcement In baramati : मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा (Fourth Women Policy) अजित पवार यांनी केली आहे.
Fourth Women Policy in Maharastra : अनेकदा सोशल मीडियावर आपण काही युझर्सची नावं चार शब्दांची पाहतो. काहीजण आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव देखील आपल्या नावात लावतात. तर गेल्या काही दिवसात अधिकृत कागदपत्रांवर देखील आई आणि वडिलांचं नाव संपूर्ण नावात लावण्याचा कल तरुणाईमध्ये दिसून येतोय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक मोठी घोषणा (Ajit Pawar announcement In baramati) केली आहे. मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
काय म्हणाले Ajit Pawar?
आपण महिलांना संधी दिली. आपण चौथं महिला धोरण आणलं. महिला मंत्री असल्याने तिलाही त्यातील माहिती होती. तुम्हाला लवकरच काही माहिती मिळेल. आधी अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं. आता इथून पुढं आधी मुलाचं किंवा मुलीचं नाव, नंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव असं संपूर्ण नाव असणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतोय, की जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला 6 टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर 1 टक्का सवलत आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 50 लाखांचं घर घेयचं असेल तर तुमचे 50 हजार रुपये वाचतील, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे जर तुम्हीला घर घ्यायाला असेल तर नवऱ्याला सांगा की माझ्या नावावर घे, त्याचे पैसे वाचतील, असा सल्ला देखील अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, आज सर्वच क्षेत्रात महिला पुढाकार घेत आहेत. स्वतःचं कुटुंब कशाप्रकारे सांभाळायचं याची जाणीव महिलांना झाली आहे. त्यामुळेच महिला आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी बचतीकडे वळल्या आहेत. परंतु अल्पबचतीमुळे त्यांची आर्थिक गरज पूर्ण होऊ शकत नाही, महिलांना अधिक सक्षम कसे बनविता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सडक अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात सहभाग घेऊन या महिलांशी संवाद साधताना आदिती तडकरे यांनी म्हटलं होतं.