मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक गैरव्यवहारामुळे आणखी एकाचा नाहक मृत्यू झाला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. पीएमसी बँकेतील ही १७ लाख खाती नाहीत तर ही १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारती सदरांगानी असं बळी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. भारती यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 73 वर्षांच्या भारती या पीएमसी बँक खातेधारक चंदन चोत्रांनी यांच्या सासू आहेत.  मुलीचे बँकेत २ कोटी २५ लाख रूपये अडकल्याने त्यांना धक्का बसला. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. भारती सदरांगानी या सोलापूरच्या राहणाऱ्या आहेत. रविवारी दुपारी 2 वाजता त्यांचे निधन झाले. चंदन यांचे मुंबईतील मुलुंड पीएमसी शाखेमध्ये खाते आहे. 


आतापर्यंत ६ जणांचा पीएमसी बँक गैरव्यवहाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मुरलीधर धारा हे पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचे तिसरे बळी ठरले आहेत. याअगोदर फटतो पंजाबी आणि संजय गुलाटी या दोन खातेधारकांचा तणावामुळे मृत्यू झाला होता.


आज आझाद मैदानावर आंदोलन 


पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक ठेवीदार, खातेदारांनी आंदोलन कारण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन उद्या २२ रोजी सकाळी १०.३० ते ३ या वेळत मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई विभागातील २१ गुरूद्वार एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


या आंदोलनाच्या निमित्ताने बॅंक खातेदार मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिख समुदायाने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला असून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यालयातमध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.