देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ईडीची (ED) कारवाई सुरू झाल्यापासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना (Shivsena) खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) या मतदार संघातून गायब होत्या. मात्र शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर भावना गवळी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदार संघातून गायब असलेल्या भावना गवळी दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसल्या होत्या. त्यानंतर भावना गवळींची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.


त्यानंतर भावना गवळी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शिवसेनेतून गळती सुरु असताना अनेकांनी पक्षातही प्रवेश केला आहे. भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे खासदार गवळी यांचे  हे पूर्वाश्रमीचे पती असून त्यांचा घटस्फोट झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे



"भावना गवळी यांच्यासोबत माझा दहा ते बारा वर्षांपूर्वी संबंध संपलेला आहे. मी दुसरा विवाह केला आहे आणि मला मुलं आहेत. मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे," असे प्रशांत सुर्वे यांनी सांगितले. सुर्वे यांनी यापूर्वी वाशिमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे.