भाजपच्या प्रचारासाठी खासदार मनोज तिवारी महाराष्ट्रात
भाजपच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि खासदार मनोज तिवारी महाराष्ट्रात
ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि खासदार मनोज तिवारी यांनी हजेरी लावली. प्रचार रॅलीमध्ये मनोज तिवारी यांनी केळकर यांना निवडणून देण्याचं आवाहन केलं. मनोज तिवारी हे उत्तर भारतीय नेते असल्याने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. मनोज तिवारी यांना पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची ही प्रचार रॅली ढोकाळी नंदीबाबा मंदिरापासून सुरु झाली. यावेळी मनोज तिवारी यांनी भोजपूरीमध्ये महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं. मनोज तिवारी हे देशातील सध्या सर्वात चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एक आहे. सध्या ते दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे.
मनोज तिवारी यांच्याकडे दिल्लीचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील पाहिलं जात आहे. उत्तर भारतीय लोकांमध्ये त्यांची क्रेझ आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्य़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अशा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप नक्की प्रयत्न करणार आहे.