बुलडाणा : नागपूरच्या एका कृषीक्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाचं शनिवारच्या वृत्तपत्रात आलेलं हे वृत्त. खासदार नाना पटोलेंच्या तोंडची वक्त वृत्तपत्रांनी छापली. मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार तयारी सुरू असताना झालेलं विधान अंगाशी येऊ शकतं याची जाणीव झाल्यावर मग नाना पटोले यांनी सारवासारव सुरू केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले यांची सध्या पक्षात घुसमट होते आहे, त्यामुळेच त्यांच्याकडून केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांवर टीका चालूच असते. मात्र स्थानिक पातळीवरही सध्या राजकारण चांगलचं तापलंय.


माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळीक पटोले यांना खुपते आहे.  लोकसभेच्या निवडणूक पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. त्यामुळे मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. पण त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.


शुक्रवारी प्रक्षोभक टीका केल्यावर चूक पटोले यांच्या लक्षात आली. त्यामुळे वेळीच सारवासारव प्रकरण रफादफा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण शिवसेनेनंही त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवली. दरम्यान पटोलेंनी दिलेल्या स्पष्टीकरणानं मोदी यांना त्यांचे मंत्री घाबरतायत, की नाना पटोलेच घाबरतायत, असा प्रश्न आता विचारलाय, जातोय.