Supriya Sule Fire News : राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबाबत मोठा अनर्थ होताना टळला. (Pune News) हिंजवडीतल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला.  (Maharashtra Political News) दिव्याचा स्पर्श झाल्याने साडीच्या पदराने पेट घेतला. मात्र सुप्रिया सुळे यांनी बाजूला होत लगेच साडीला लागलेली आग विझवली. (Breaking News Today Maharashtra) पुण्याच्या हिंजवडीत कराटे प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनादरम्यान ही घटना घडली. ( Political News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार सुप्रिया सुळे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे आणि बारामतीत त्यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सुप्रिया या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरमाला उपस्थित होत्या. त्यांच्या साडीने एका कार्यक्रमांमध्ये दीप प्रज्वलन करत असताना पेट घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. अनवधानाने साडीने पेट घेतला पण वेळीच आग विझविण्यात आली.


कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं ही आग मोठी नव्हती आणि तात्काळ विझविण्यात आली.  या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ठेवण्यात आलेल्या दिव्यामुळे त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याचे दिसत आहे. 



दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेय. मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. कुणीही काळजी करु नये. आपण दाखविलेले प्रेम आणि काळजी माझ्यासाठी मोलाची आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद, असे त्यांनी सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.