पुणे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यासकरुन आधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुणे म्हणजे ज्ञानाची पंढरीच म्हणावी लागेल. तालमीत पैलवानाला तयार करतात अगदी तसचं अनेक दशकांपासून पुण्याने कित्तेक आधिकाऱ्यांना देशसेवेसाठी तयार केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अर्थात यूपीएससीचा अभ्यास (UPSC Study) करण्यासाठी परीक्षेचे उमेदवार दिल्लीला जातात तर महाराष्ट्र राज्य आयोग (Maharashtra Public Service Commission) अर्थात एमपीएससीचा अभ्यास (MPSC Study) करण्यासाठी परीक्षेचे उमेद्वार पुणे निवडतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास दिल्ली किंवा पुण्यातूनच होतो असं काही नाही. पण तालीम ती तालीमचं. म्हणून पुण्यातली भरपूर तरुण मंडळी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दिसून येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसंदर्भात एक भयानक घटना पुण्यात घडली आहे. अभ्यासासाठी अभ्यासिकेत गेलेल्या एका मुलीचा चक्क हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं सांगितलं जातयं. सतत अभ्यासचा विचार करुन त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांमध्ये पाहालया मिळते. वाढत्या स्पर्धेमधे आपण टिकलं पाहिजे आणि त्यासाठी  जास्त मेहनत घ्यायला पाहिजे, म्हणून स्पर्धा परीक्षेचे उमेदवार तणाव घेत असतात. असाच काहीसा तणाव या मुलीने घेतला असावा. कारण, वैद्यकतज्ज्ञांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली असून चंदननगर पोलिसानी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


दिवस-रात्र सतत अभ्यास एके अभ्यास असाच विचार करणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धकांनी आपल्या अभ्यासाप्रमाणेच आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्य निरोगी असेल तरच केलेला अभ्यास लक्षात राहील आणि त्या ज्ञानाचा वापर करता येईल.


पाहा व्हिडिओ...