दीपक भातुसे, मुंबई : एक मोठी बातमी येत आहे. एमपीएससी परीक्षा येत्या ८ दिवसात घेण्याची शक्यता आहे. पुढच्या आठ दिवसात परीक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वयोमर्यादा परीक्षेपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज परीक्षा पुढे ढकलल्यानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. रास्तारोको करत त्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली. 14 मार्च रोजी होणारी परी़क्षा त्यानंतरच्या रविवारी म्हणजेच 21 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'MPSC च्या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, याची दक्षता महाविकास आघाडी सरकार घेणार.'. मुख्यमंत्री कार्यालयातून थोड्याच वेळात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात येईल.


परीक्षा पुढे ढकलण्याच्या MPSC च्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा झाली. MPSC किंवा सरकार थोड्याच वेळात याबाबत भूमिका जाहीर करणार आहे. परीक्षा पुढे ढकलू नये, तर ठरलेल्या तारखेलाच म्हणजे १४ मार्च रोजी घ्यावी यासाठी सरकारवर सर्व स्तरातून दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.


विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत असून लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना विद्यार्थ्यांचे आंदोलन संवेदनशिलतेने हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्याची कायदा सूव्यवस्था बिघडू देऊ नका. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे पाहता मुख्यमंत्री लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत.


दुपारपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.