MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय
अर्ज भरण्याची मुदत वाढवली नाही तर...पाहा काय झालाय मोठा निर्णय
मुंबई : MPSC च्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टळणार असून मोठा दिलासा मिळाला आहे. MPSC च्या गट क वर्गातील 900 जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया तूर्तास स्थगित केली आहे.
MPSC च्या गट क वर्गातील 900 जागांची जाहिरात शासनातर्फे देण्यात आली होती. त्यासाठी फॉर्म वेबसाईटवर जाऊन भरावे लागणार होते. यापूर्वी देखील या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने मुदतवाढ करण्यात आली होती. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र आजही वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या.
या प्रकरणी आता दखल घेऊन सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. ही माहिती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस आणि कमिशनच्या ट्वीटरवरून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकी काय होती अडचण
MPSC च्या गट क वर्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा फॉर्म भरला जातं नव्हता. फॉर्म भरला तर पैसे भरले जातं नाही अशा तांत्रिक अडचणी येत होत्या. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं. विद्यार्थी तासंतास संगणक किंवा मोबाईल वर प्रयत्न करत होते.
नुकताच यासंदर्भात मोठा निर्णय झाला आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. तर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.