MPSC : एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध का?
काही महिन्यांपूर्वी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं प्रखर आंदोलन पाहायला मिळालं होतं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यात दिसून आली.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आज पुन्हा पुण्यात आंदोलन केलं. विद्यार्थी शिक्षण मंडळासमोर ठिय्या धरत विद्यार्थी आक्रमक झाले. या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहुयात. काही महिन्यांपूर्वी पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं प्रखर आंदोलन पाहायला मिळालं होतं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यात दिसून आली. विविध मागण्यांसाठी MPSC विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळासमोर आंदोलन केलं. (mpsc maharashtra public service commission students agiation at pune due to many demands)
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी MPSC विद्यार्थी आक्रमक झालेत. MPSCच्या विद्यार्थ्यांचा नेमक्या विरोध कशाला आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूयात.
नवीन अभ्यासक्रमाला विरोध का?
UPSCच्या धर्तीवर MPSCकडून परीक्षेत बदल. 2023पासून मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत. सध्या मुख्य परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनं होते. 4-5 वर्षांपासून सुरू असलेल्या तयारीचं काय, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. तसेच 2025 पासून वर्णनात्मक पद्धत सुरू करण्याची मागणी आहे.
दर वर्षी लाखो विद्यार्थी MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. वर्णनात्मक पद्धतीची अंमलबजावणी, सदोष प्रश्नपत्रिका असे MPSC विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत. हे प्रश्न नागपूर हिवाळी अधिवेशन काळातच सोडवावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. आता शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री महोदय MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.