Samruddhi Mahamarg Toll : एका दिवस एक कोटी...समृद्धी महामार्गावर कोट्यवधींची टोलवसुली; आतापर्यंत जमलेली रक्कम पाहिली?
Samruddhi Mahamarg Toll : देशातील विविध ठिकाणांना रस्ते मार्गानं जोडण्यासाठीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले. ज्यामुळं अनेक तासांचा प्रवास कमी होऊन महत्त्वाची शहरं जवळ आली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग त्यापैकीच एक.
Samruddhi Mahamarg Toll : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्याच्या घडीला वाहतुकीसंदर्भातील अनेक प्रकल्प आकारास येताना दिसत आहेत. अशाच प्रकल्पांपैकी एक महत्त्वाकांक्षी नाव म्हणजे समृद्धी महामार्ग. 11 डिसेंबरला खुद्द (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय ज्यानंतर लगेचच या मार्गानं सर्वसामान्य वाहनांचा प्रवास सुरु झाला. या वाहनांकडून समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी (Toll) टोलवसुलीही सुरु झाली आणि पाहता पाहता ‘एमएसआरडीसी'च्या तिजोरीत टोलवसुलीतून कोट्यवधींची रक्कम जमा झाली.
समृद्धी महामार्गावरील 520 किमीच्या पट्ट्यामध्ये 19 टोलनाके आहेत. जिथून प्रवास करताना वाहनधारकांना 900 रुपये इतका टोल भरावा लागतो. ‘जितका प्रवास तितका टोल’ या तत्वावर ही टोलवसुली होते.
सरासरी दिवसाला 15 हजार वाहनं प्रवास करत असणाऱ्या या मार्गावर तुम्ही ज्या एक्झिट पॉईंटपर्यंत प्रवास करता तिथपर्यंत तुम्हाला टोल भरावा लागतो. टोलवसुलीच्या या प्रणालीमुळं एमएसआरडीसीला फायदाच होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
महामार्गामुळे कशी होतेय आर्थिक समृद्धी? पाहा काही आकडेवारी
आतापर्यंत प्रवास केलेली वाहनं- 8,79,058
महिन्यानुसार विभागणी- डिसेंबर, 2,20,903 वाहनं; जानेवारी 4,04,302 वाहनं, फेब्रुवारी 2,53,853 वाहनं.
डिसेंबरमधील लोकार्पणापासून 20 फेब्रुवारीपर्यंतची एकूण टोलवसुली 62 कोटी 8 लाख 43 हजार 109 रुपये.
डिसेंबर - 13,20,51,361 रुपये टोलवसुली
जानेवारी - 27,74,11,968 रुपये टोलवसुली
फेब्रुवारी- 21,13,79,780 रुपये टोलवसुली.
दिवसागणिक या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्याचे थेट परिणाम टोलच्या रकमेमध्येही दिसत आहे अशी माहिती संबंधित मगामार्ग अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.
समृद्धी महामार्गावर कोणत्या वाहनास प्रति किलोमीटर किती टोल आकारला जातो?
मोटर, जीप , व्हॅन अथवा हलकी मोटर वाहनं
- रु.1.73 कि.मी.(प्रती किमी) / 900 रुपये
हलकी व्यावसायिक वाहनं, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस
- रु 2.79 कि. मी.(प्रती किमी) / 1450 रुपये
बस अथवा ट्रक
- रु 5.85 कि. मी.(प्रती किमी) / 3042 रुपये
हेसुद्धा वाचा : Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
तीन आसनं असणारी व्यावसायिक वाहनं
- 6.38 कि. मी.(प्रती किमी) / 3317 रुपये
अवजड बांधकाम यंत्रसामग्री
(एचसीएम) अथवा अनेक आसांची वाहनं (एएमव्ही) चार अथवा आसांची
- रु 9.18 कि मी(प्रती किमी) / 4773 रुपये
अती अवजड वाहनं (सात किंवा आठ आसानांची)
- रु 11.17 (प्रती किमी) / 5810 रुपये