Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?

Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.

Updated: Feb 7, 2023, 09:36 AM IST
Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
Samruddhi Mahamarg Other Upcoming Expressways in Maharashtra Shaktipeeth Expressway or Shaktipeeth Mahamarg Shaktipeeth highway nagpur goa expressway nitin gadkaris and devendra fadanvis big announcement

Nagpur – Goa Expressway : मोदी सरकारने महाराष्ट्रात मिशन महा समृद्धी हातात घेतलं आहे. पहिले नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai) यांमधील अंतर समृद्धी महामार्गामुळे निम्म्यावर आलं आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. या महामार्गावरुन गाड्या सुसाट प्रवास करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये बहुप्रतिक्षित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण झाले. आता समृद्धी नंतर शक्तिपीठ (Shaktipeeth Expressway) हे मिशन सरकारने हाती घेतलं आहे. (Samruddhi Mahamarg than now Shaktipeeth Expressway or Shaktipeeth Mahamarg shaktipeeth highway nagpur goa expressway nitin gadkaris and devendra fadanvis big announcement)

आता मिशन 'शक्तिपीठ'! (Samruddhi Mahamarg)

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 760 किलोमीटर लांबीचा 'ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे' (shaktipith highway) उभारला जाणार आहे. यात  विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागांतील 12 जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गामुळे दक्षिण भागातील विकासाला चालना मिळणार असून वर्ध्याहून गोव्याला 11 तासांमध्ये पोहोचता येणार आहे.

 

शक्तिपीठ महामार्ग असं नाव का?  (Why the name Shaktipeeth Highway)

आता तुम्ही विचार करत असाल की, या महामार्गाला शक्तिपीठ असं नाव का दिलं आहे. तर हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी आणि कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांना जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाला शक्तिपीठ असं म्हटलं गेलं आहे. 

नागपूर गोवा द्रुतगती मार्गाचे फायदे  

1. या महामार्गामुळे शहरांमधील निर्यात आणि आयात व्यापार वाढण्यास मदत होणार आहे. 

2. शक्तिपीठ एक्स्प्रेस वे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. 

3. हा महामार्ग सुरु झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांमधून गोवा आणि नागपूर दरम्यान जलद वाहतूक होणार आहे. 

4. नागपूर ते गोवामधील अंतर कमी होईल. 

5. राज्य सरकारने ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकल्पांचा एक भाग म्हणून झाडे-झुडपांसह हजारो झाडे महामार्गालगत लावली जाणार आहेत. 

6. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध कृषी-आधारित आणि औद्योगिक प्रकल्प उभारले जातील. ही अनेक केंद्रे उभारल्यास रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.