Mumbai Car Accident: मुंबईतल्या गावदेवी परिसरातील रस्त्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे रस्ता क्रॉस करणाऱ्या 2 मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा थरार समोर आला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना शुक्रवारी दुपारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील गावदेवी परिसरात 2 मुली रस्ता क्रॉस करत होत्या. त्यांनी रस्त्याची एक बाजु सुरक्षितपणे क्रॉस केल्याचे व्हिडीओत दिसतंय. यानंतर काही क्षण त्या रस्त्याच्या मध्यात उभ्या होत्या. दुसरा रस्त्ता क्रॉस करणार इतक्यातच डाव्या बाजुने एक भरधाव कार आली आणि तिने दोघींना जोरदार धडक दिली. 


नालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरवर बलात्कार


दोन्ही मुली 14 ते 16 वर्षाच्या असल्याचे सांगितले जात आहे. या विद्यार्थीनी दहावीच्या विद्यार्थीनी आहेत. या अपघातामध्ये दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर काही वेळातच आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.



घटना घडल्यानंतर कार चालक पळून गेला. यानंतर मुलींच्या पालकांकडून या घटनेसंदर्भात पोलीस तक्रार करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा शोध घेतला जात आहे.


'कोंबडा करुन टायरमध्ये टाकून मारेन' पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणाची आत्महत्या