मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आणि राज्यात थंडीचा जोर कायम होता. मात्र आता मुंबईत थंडीचा पारा कमी झाला आहे. हवामान खात्याने वर्तवल्यानुसार, डिसेंबर अखेर मुंबईच्या किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे. याचा परिणाम मुंबईच्या थंडीवर झाल्याचं दिसत आहे. २८ डिसेंबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा जोर कायम राहील. त्यामुळे राज्यात आणखी काही दिवस गारवा अनुभवता येईल. 



कोरोनाच्या सावटामुळे यंदा मुंबईसह राज्यातील नागरिकांना तसा थंडीचा हवा तसा आनंद घेता आला नाही. कोरोनामुळे नागरिक बाहेर पडणं टाळत आहे. असं असलं तरीही ही थंडी सुखावणारी होती.




महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 6 अंशावर येऊन पोहचला आहे. महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरा कमी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी हिमकण पाहायला मिळत आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक येऊ लागले आहेत.