मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांसमोर स्वतःच्याच ऑफिसमध्ये संपवले जीवन
Mumbai Crime News Today: मुंबईतील एका व्यावसायिकाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime News Today: मुंबईत शुक्रवारी रात्री जवळपास पावणे आठच्या सुमारास भेंडी बाजारात एका व्यापाऱ्याने त्याच्याच कार्यालयात स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहे.
जेजे मार्ग पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री जवळपास आठ वाजण्याच्या सुमारास भेंडी बाजार परिसरातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर 52 वर्षीय व्यावसायिक इकबाल मोहम्मद सिवानी यांनी त्यांच्या कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ज्यावेळी इकबाल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली तेव्हा कार्यालयात इतरही कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, इकबाल हे आर्थिक तंगीचा सामना करत होते. कर्ज फेडता न आल्यामुळं व व्यवसायात सतत होत असलेला तोटा यामुळं त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणात सध्या तपास करत आहे. तसंच, आत्महत्येचं कारण फक्त कर्ज आहे की आणखी काही याचाही शोध घेतला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून हत्यार जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ADR अंतर्गंत पोलिस केस दाखल केली आहे. तर, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसंच, याची व्हिडिओग्राफीदेखील केली जाणार आहे.
दरम्यान, कर्जामुळं आत्महत्या करणारे हे एकच प्रकरण नाहीये. कर्जामुळं तणावात असणारे आणि व्यावसायात तोटा झाल्यामुळं मागीच महिन्यातच एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. श्रीनिवास नावाच्या व्यक्तीने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. श्रीनिवास गेल्या काही वर्षांपासून विदेशात नोकरी करत होता. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. मात्र सतत होत असलेल्या नुकसानीमुळं आणि वाढत्या कर्जामुळं त्यांनी अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या केली होती.