Mumbai Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज सकाळी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालय परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी न्यायालय परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या 30 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. तब्बल जवळजवळ एक तास चालला दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालला. 


गणपत गायकवाड यांचे वकील म्हणतात...


आज गणपत गायकवाड आणि इतर चार लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश दिले आहेत. पोलिसांना अधिक पोलिस रिमांड कशासाठी हवी? याचे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले. तपास झालाय तेवढा पुरेसा आहे अधिक पोलीस कस्टडीची गरज नाही, असं आम्ही कोर्टसमोर मांडली. मात्र, कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आम्ही सर्टिफाईड कॉपी पाहून पुढील रणनिती ठरवू, असं आमदार गणपत गायकवाड यांचे वकील उमर काझी यांनी म्हटलं आहे.


झी 24 ताससमोर गणपत गायकवाड यांची कबुली


पोलिस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली, असा धक्कादायक खुलासा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी झी 24 तासशी केला होता.


मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचे आहे, असंही भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं होतं.