वारंवार बलात्कार अन् मारहाण; पोटच्या लेकीसाठी बापच झाला हैवान; अखेर मुलीचा मृत्यू
Mumbai Crime News: बाप-लेकीचे नाते हळवे असते. मात्र नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.
Mumbai Crime News: नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनीच त्यांच्या 22 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचं समोर आले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर ही घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या 22 वर्षांच्या मुलीवर तिचे वडिलच अत्याचार करत होते. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही तिच्यावर अमानुष अत्याचार सुरू होते. तिला सतत घरात डांबून व मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला जात होता. मुलीचे 54 वर्षीय वडिलच तिच्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार तिच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली
पीडित तरुणी मागील 3 महिन्यांपासून क्षयरोगाने ग्रस्त होती. तिला 11 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर आईने धाडस एकटवत पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवले. वडिलांनी केलेली मारहाण आणि शारिरीक अत्याचारामुळंच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. आईने केलेल्या आरोपांवरुन पोलिसांनी पित्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
पीडित मुलीले वडील वारंवार तिच्यावर बलात्कार करत होते. या प्रकाराबद्दल कुठे सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही देत होती. तसंच, मुलीला जबरदस्ती घरात डांबून ठेवत व मारहाण करत होते. त्यामुळं पीडित मुलगी व तिची आई हा अत्याचार सहन करत होते. मात्र, पीडित मुलीच्या वडिलांचा त्रास वाढतच होता. मध्यंतरीच्या काळात पीडिता गर्भवतीदेखील राहिली होती. मात्र आरोपी पित्याने बळजबरी तिचा गर्भपातही केला होता. तसंच, मारहाणही केली होती. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.