पुण्यात दारु पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरुच आहेत. पुणे सह मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
Mumbai Crime News Pune Crime News : बदलापूर येथील घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहते. पुण्यात अल्पवयीन मुलीवर दारु पाजून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. तर, मुंबईत फेरीवाल्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. या घटनामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय... धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीला दारु पाजून तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार केलेत.. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल केलाय.. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघं फरार आहेत.. हे सगळे मित्र आहेत.. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय..
पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीय.. 15 ऑगस्टला भवानी पेठ परिसरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय.. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून एका 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.. शाळेतील स्वच्छतागृहाच्या बाहेर सदर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे...
मुंबईतील नागपाडा परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मुंबईतील नागपाडा भागातही एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडलीये.. कानातले विकणा-याने 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केलाय.. याप्रकरणी पोलिसांनी झुबेर शाह या आरोपीला अटक केलीये.. शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेनं या नराधमाचं कृत्य पाहून आरडाओरडा केला.. त्यानंतर झुबेर शाहनं पळून जाण्याचा प्रयत्न केला.. दरम्यान स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.. पोलिसांनी झुबेर याच्यावर विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय..