गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण! कमानी मुस्लिम शैलीच्या तर सजावट हिंदू शैलीनुसार, बांधकामाचा इंटरेस्टिंग इतिहास
Gateway of India 100 Years : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. जाणून घेऊया गेटवे ऑफ इंडिया इतिहास.
Gateway of India : गेटवे ऑफ इंडिया... फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेली वास्तू. मुंबईत येणारा प्रत्येक वक्ती मग तो भारतीय असो की परदेशी प्रत्येकालाच गेटवे ऑफ इंडिया पाहण्याची इच्छा असते. मुंबईच्या अरबी समुद्राजवळ असलेले गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार म्हणून ओळखले जाते. गेटवे ऑफ इंडिया या वास्तूला 4 डिसेंबर 2024 रोजी बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेटवे ऑफ इंडियाच्या कमानी मुस्लिम शैलीच्या तर सजावट हिंदू शैलीनुसार आहेत. गेटवे ऑफ इंडिया या वास्तूच्या बांधकामाचा इतिहास खूपच इंटरेस्टिंग आहे.
हे देखील वाचा... 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट...
मुंबईतल्या अपोलो बंदराच्या समुद्र किनाऱ्यावर दिमाखात उभी असलेली वास्तू म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. ही भव्य दिव्य वास्तू पाहून सगळेच जण अचंबित होतात. 16 व्या शतकात उभारण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडिया या वास्तूने 100 वर्षात अनेक संकटे पाहिली आहेत. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू 26/11 सारख्या दहतवादी हल्ल्याचा साक्षीदार आहे. ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले होते. शाही भेटीच्या वेळी गेटवे ऑफ इंडिया या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते. यामुळे सम्राटाचे स्वागत कार्डबोर्डच्या संरचनेद्वारे करण्यात आले. डिसेंबर 1911 मध्ये ही संरचना उभारण्यात आली.
हे देखील वाचा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माझगाव डॉक! समुद्रात असलेल्या किल्ल्यावर सर्वात मोठा जहाज बांधणीचा कारखाना
गुजराती स्थापत्यकलेचा समावेश करून इंडो-सारासेनिक शैलीत गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यात आले. मार्च 1913 मध्ये या स्मारकाची पायाभरणी करण्यात आली. 1914 मध्ये वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी स्मारकासाठी अंतिम डिझाइन मंजूर केले. 1920 मध्ये गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम सुरू झाले, त्यानंतर 4 वर्षांनी बांधकाम पूर्ण झाले आणि शेवटी 4 डिसेंबर 1924 मध्ये गेटवे ऑफ इंडिया सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. 85 फूट उंच रचना बेसाल्टने बांधलेली आहे आणि त्यावर विजयी कमान आहे. या प्रवेशद्वाराजवळील समुद्रात पर्यटकांना भेट देण्यासाठी बोट सेवाही उपलब्ध आहे.
गेटवे ऑफ इंडियाच्या कमानी मुस्लिम शैलीनुसार आहेत. याच्या सजावटीवर हिंदू शैलीची छाप पहायला मिळते. गेटवे ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती घुमटाचा व्यास 48 फूट आहे आणि स्मारकाची उंची 83 फूट आहे. या स्मारकात बांधलेल्या कमानीच्या प्रत्येक बाजूला 600 लोकांची क्षमता असलेले हॉल देखील आहेत.