Airport In Uttar Pradesh : भारतामध्ये एकूण 137 विमानतळ आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. पण, भारतातील एक राज्यात तब्बल 23 विमानतळं आहेत. यापैकी 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट आहेत. जाणून घेऊया हे राज्य कोणते?
भारतातील विविध राज्यांमध्ये मिळून 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलकाता, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई, तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबाद, गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमृतसर, लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटी, गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( सिव्हिल एन्क्लेव्ह), श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, श्रीनगर (सिव्हिल एन्क्लेव्ह), जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड विमानतळ, कालिकत, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (सिव्हिल एन्क्लेव्ह), पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे (यूटी), इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई, जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद, बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, बेंगळुरू, कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट, कोची, भारतरत्न बाबासाहेब डॉ.बी.आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (महाराष्ट्र) हे महत्त्वाची विमानतळं आहेत. मात्र, भारतातील एक राज्य आहे जिथे तब्बल 5 इंटरनॅशल एअर पोर्ट आहे.
5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट असलेल्या या राज्याचे नाव आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य आहे.
उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांची यादी
- चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ
- महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या
- लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाराणसी I
- कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नोएडा
- नोएडा आंतरराष्ट्रीय जेवार विमानतळ, नोएडा
उत्तर प्रदेशातील देशांतर्गत विमानतळ
आग्रा विमानतळ घरगुती
आझमगड विमानतळ
बरेली विमानतळ
चित्रकूट विमानतळ
गाझियाबाद, हिंडन विमानतळ
गोरखपूर विमानतळ
झाशी विमानतळ घरगुती
कानपूर विमानतळ
ललितपूर विमानतळ
मेरठ विमानतळ घरगुती
मुरादाबाद विमानतळ
पालिया विमानतळ