रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावाजवळ झा़ड कोसळलंय. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात. मध्यरात्री १२च्या सुमारास झाड पडंल. हे झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. 


गोव्याकडे जाणाऱ्या आणि गोव्याकडून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बुलडोझरच्या मदतीनं झाड बाजूला करण्याचं काम सुरु आहे. पण अद्याप ते शक्य झालेलं नाही. पहाटेच्या सुमारासा वाहतूक सुरू झाली असून अत्यंत धिम्या गतीनं वाहनं पुढे सरकत आहेत.