Mumbai-Goa highway On the landslide away : मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे. मात्र, दरड खाली येण्याचा धोका आहे. त्यामुळे परशुराम घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प


डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.


चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी


परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. या आलेल्या चिखलामुळे काही वाहने परशुराम घाटात मातीत अनेक वाहने रुतली होती. मात्र आता पाऊस थांबला असून माती बाजूला करण्याचं काम सुरु आहे.


या पर्यायी मार्गाचा वापर करु शकता...


दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गावर असलेला परशुराम घाट आणि कशेडी येथील खवटी घाट वगळून दुसऱ्या मार्गाने प्रवास करता येऊ शकतो. मुंबईकडून कोकणात जाताना महाड - लाटवण मार्गे दापोली आणि दापोली येथून दाभोळ - धोपावे फेरीबोटीने धोपावे येथून श्रृंगारतळी मार्गे थेट गुहागर आणि चिपळूण तसेच रत्नागिरी येथे जाता येते.


रत्नागिरी जिल्ह्यात नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. दापोली आणि गुहागर, चिपळूण तालुक्यात चांगला पाऊस झाला. तसेच अवकाळी पावसानचा परशुराम घाटाला फटका बसला. तर अवकाळी पावसाने आंबा आणि काजू पिकांना मोठा धोका पोहोचला आहे.आधीच आंबा पिक कमी आल्याने पावसाचा तडाख्याने बागायदार संकटात आहेत.