रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसत आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. काही ठिकाणी सुरु आहे. त्याचच खड्डे असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अपुरा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्गामुळे ही वाहतुकीवर नियंत्रण देणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्या असल्याने पेण ते वडखळ दरम्यान चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने वाहनधारक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात आणि गोव्याला जायला निघालेत. त्यातच सुटी असल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा आहेत. पेण ते वडखळ या दोन तासांच्या प्रवासाकरिता तब्बल पाच ते सहा लागत आहेत.


वाहतूक कोंडी आणि त्यातच रस्त्यांची सुरू असलेली कामे आहेत. तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडलेली दिसून येत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होत आहे. कारण अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने समस्या निर्माण झाली आहे.



नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण तसेच गोवाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही प्रमाणात रस्त्यांची सुरू असलेली कामे आणि चालकांची बेशिस्त यामुळे कोंडीत जास्त भर पडताना दिसून येत आहे. वाहतूक पोलीस लक्ष देत असले तरी कोंडी फुटण्यास उशिर होत होत असल्याचे समोर येत आहे.