नवी दिल्ली : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये दिवसागणिक गर्दीचे प्रमाण वाढत आहे. पण जगातील 403 शहरांतील ट्रॅफिक पाहता मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. जगातील 56 देशांतील साधारण 403 शहरांच्या ट्रॅफिकवर एक रिपोर्ट तयार करण्यात आलाय. यानुसार मुंबई शहर हे जगातील सर्वाधिक ट्रॅफिकचे शहर बनले आहे. मुंबईत एखाद्या व्यक्तीला ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी 65 टक्क्यांहून जास्त वेळ लागतो. तर दिल्लीतील लोकांना आपल्या गंताव्य स्थानावर पोहोचण्यासाठी 58 टक्क्याहून जास्त वेळ लागतो. हा अहवाल 'टॉमटॉम" या लोकेशन टेक्नोलॉजी कंपनीने तयार केला आहे. ही कंपनी एपल आणि उबेरचे नकाशे तयार करते. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते 8 वाजण्यादरम्यान सर्वाधिक ट्रॅफिक असते. मुंबईत प्रवास करायचा असल्यास रात्री 2 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही योग्य वेळ असते कारण यावेळेत ट्रॅफिक खूप कमी असते असेही यातून सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईत सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंतच्या वेळेत आपल्या ठरलेल्या स्थानी पोहोचण्यासाठी 80 टक्क्याहून अधिक वेळ लागतो. तर संध्याकाळच्या वेळेस हे प्रमाण 102 टक्क्यांवर पोहोचते. सर्वात जास्त ट्रॅफिक दरम्यान लागणाऱ्या वेळेवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मुंबईत प्रति किलोमीटरवर सरासरी 500 कार चालत असतात. हा आकडा दिल्लीपेक्षाही जास्त असल्याचे टॉमटॉमचे जनरल मॅनेजर बारबारा बेलपीयरे यांनी सांगितले आहे.