मुंबई  : Mumbai-Madgaon superfast special train on Konkan railway Route : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता बुधवारी मुंबई-मडगाव सुपरफास्ट विशेष गाडी सुरु करण्यात आली आहे. या गाडीचे आरक्षणही सुरु झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी बुधवारी दि. 8 रोजी मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह सुपरफास्ट एकेरी विशेष एक्स्प्रेस चालण्याची घोषणा केली आहे. 01099 मुंबई - मडगाव ही सुपरफास्ट रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. 


या गाडीला ठरावीक थांबे देण्यात आले आहेत. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी असे थांबे असतील. एक विस्टाडोम कोच, तीन वातानुकूलित चेअर कार, 10 द्वितीय श्रेणीचे डबे आणि एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे आहे. या गाडीचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांना सर्व आरक्षण केंद्रावर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर तिकिटे उपलब्ध असतील, असे कळविण्यात आले आहे.