Mumbai Metro 3: मुंबईत मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेने मेट्राच्या कंत्राटदाराला काही दिवस काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेकडून हे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडली आहे. प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतोय. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून नियमावलीही राबवण्यात आली आहे. काही विकासक आणि कंत्राटदारांनाही इमारतीचे व इतर कामे थांबवण्यास नोटिस बजावण्यात आली आहे. तर, बांधकामासंबंधी काही नियमावली लागू करण्यात आली आहे. 


मेट्रो 3च्या कंत्राटकाने नियमावली न पाळल्यामुळं काहि दिवस काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शकाचे बीकेसी भागात पालन न होत असल्याने मुंबईतील मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. 


मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानंतर पालिकेने काही उपाययोजना आखल्या आहेत. मुंबईत सुरू असलेली मोठी बांधकाम काही दिवस थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी, सरकारी मोठे प्रकल्प, हवा प्रदूषित करणारे काही प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


फटाके उडवण्यासाठी 3 तासांचा वेळ


मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली आहे. 


मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक बंद


मुंबईतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नागरिकांवरही काही निर्बंध आणले आहेत. नागरिकांना मॉर्निंग वॉक, संध्याकाळचा फेरफटका, व्यायाम , धावण्याची सवय अशा गोष्टी न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान, नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणा-या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय)  महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. काल (दिनांक ६ नोव्‍हेंबर २०२३) सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱया अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण ४ धुराडे (चिमणी) निष्‍कासित करण्‍यात आले आहेत.