गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा
Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Home For Mill Workers: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गिरणी कामगारांसाठी लवकरच 5 हजार घरांची सोडत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपलं सरकार आल्यानंतर हजार घरे दिली. जे गिरणी कामगार गेली अनेक वर्षापासून घरापासून वंचित आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी संबंधित विभागांशी विविध पर्यायावर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
म्युझियम जिथे होईल तिथे गिरणी कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देण्यात येईल. जास्तीत जास्त प्रमाणात घरे कशी उपलब्ध करुन देता येतील याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पनवेल येथील घरांची डागडुजी करण्यासाठी म्हाडा आणि एमएमआरडीएला सूचना केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.