Mumbai SRA Homes: एसआरए योजनांमध्ये (SRA Scheme) मिळालेले घर विकायचे झाल्यास त्यासाठी काही अटी शर्थीदेखील पाळाव्या लागतात. झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाकडून मिळालेली घरे अनेकदा घर मालकांकडून आर्थिक नफ्यासाठी ही घरे विकली जातात. एसआरएची घरे विकण्यासाठी पूर्वी 10 वर्षांची अट होती. मात्र, आता ही घरे 5 वर्षांनंतर विकता येणार आहेत. मात्र, तरीही एसआरएची घरे विकण्याकरिता एनओसी आवश्यक असते. हीच अट शिथिल करता येईल का याबाबत विधान परिषदेत चर्चा झाली. मात्र, ही अट शिथिल करता येणार नाही, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांवी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेत भाई गिरकर यांनी 1995 मध्ये सुरू झालेल्या एसआरए योजनेला 30 वर्षे झाली असून घर विकताना आवश्यक असलेली एनओसीची अट काढून टाकावी, अशी मागणी केली. मात्र, यावर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ही अट काढून टाकता येणार नाही, हे स्पष्ट केलं आहे. एसआरएचे घर विकताना एनओसी घ्यावीच लागेल, हा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळं ही अट शिथील करता येणार नाही.


अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरुवातीला ही अट 10 वर्षांची होती. मात्र त्यात शिथिलता देत एक लाखावरुन ती 50 हजार करण्यात आली आहे. घर नातेवाईकांच्या नावावर करायचे झाल्यास ती कार्यवाही 200 रुपयांत होते. घर विक्री करण्यासाठी एनओसी ही ऑनलाइन दिली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर फक्त 45 दिवसांतच एनओसी दिली जाणार. जर एखाद्या झोपडीधारकाचे निधन झाल्यास त्याच्या वारसाने वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही एनओसी दिली जाणार आहे, अशी माहिती सावे यांनी दिली आहे.


दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (SRA) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी 10 वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून 5 वर्षे करण्यात आला आहे.