Mumbai Pune Expressway Missing Link :  मुंबईतून पुण्याला जाताना लोणावळा खंडाळा घाटाशिवाय पर्याय नाही. खंडळा घाटात नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र, याच वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण, आता एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील महत्त्वकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पालाअंतर्गत  सह्याद्रीचा डोंगरात केबल स्टेड पुल उभरला जात आहे. यामुळे एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याचा प्रवास आणखी जलद होणार आहे.  


हे देखील वाचा...  महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल उभारला जात आहे.  या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाला आहे. 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या  शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. 


हे देखील वाचा...  महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर 


या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येत आहेत. या बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा असणार आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाले आहे. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या. मात्र, आता हे काम देखील आता प्रगतीपथावर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जात आहे. कारण, सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे इंजीनीयर्ससाठी मोठे आव्हान असणार आहे. 


हे देखील वाचा ... महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट


14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. यामुळे 2025 मध्ये प्रत्यक्षात कधी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.