Alibaug-Virar Ring Road: मुंबईहून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, मीरा- भाईंदर, वसई-विरार आणि अलिबागपर्यंतच लोकल, बस किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी तासांचा अवधी लागतो. मात्र आता हा प्रवास फक्त एक तासांवर येणार आहे. रिंग रूटच्या माध्यमातून हा प्रवास एका तासांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. सोमवारी कोस्टल रोडचे लोकार्पण पार पडले त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह एमएमआरमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याच्या योजनांवर काम करत असल्याची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मरीन ड्राइव्हहून कोस्टल रोडच्या माध्यमातून नंतर वांद्रे-वरळी सी लिंक, वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड, दहिसर-मीरा भाईंदर एलिवेटेड कॉरिडोर, भाईंदर-विरार लिंक रोड, विरार-अलिबाग कॉरोडोरला अटल सेतू जोडला जाईल. यामुळं एमएमआरचा 222 किमीपेक्षा अधिक परिसर एकमेकांशी जोडला जाईल. दक्षिण मुंबईच्या एका टोकापासून ते उत्तर मुंबईचे शेवटचे टोक दहिसर, मीरा भाईंदरसह विरार-अलिबाग व तेथून अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई आणि मग दक्षिण मुंबईला आरामात जोडले जाईल. 


एमएमआरएचा परिसर कसा जोडला जाईल


- कोस्टल रोड-मरीन ड्राइव्हहून वरळीः 10.58 किमी


- वरळी-वांद्रे सी लिंकः 5.6 किमी


- वांद्रे-वर्सोवा सी लिंकः 11 किमी


- वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडः 22.93 किमी


- दहिसर-भाईंदर लिंक रोडः 5.5 किमी


- भाईंदर-विरार लिंक रोडः 2 किमी


- विरार-अलीबाग कॉरिडोरः 126 किमी


नवी मुंबई ते मुंबई (अटल सेतू): 22 किमी 


कोस्टल रोडचे वैशिष्ट्ये काय?


- कोस्टल रोडवर वाहन चालवण्यासाठी वेगमर्यादा जास्तीत जास्त 80 किमीपर्यंतच परवानगी आहे. 


- बोगद्याच्या आत 60 किमीपर्यंतची वेगमर्यादा


- एंट्री आणि एग्जिटवर वेगमर्यादा 40 किमी प्रतितास 


- अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, दोन व तीन चाकी वाहने, सायकल, दिव्यांगांसाठीचे वाहने, बैलगाडी, टांगा, हाथगाडी इत्यादी वाहनांना कोस्टल रोडव बंदी आहे. 


- बेस्ट, एसटीने कोस्टल रोडवर प्रवास करता येणार नाही. 


- कोस्टल रोडवर प्रतिदिन 1,30,000 वाहनांचा प्रवास होण्याची शक्यता आहे. 


- भूमिगत पार्किंगमध्ये 1,852 कार पार्किंगची सुविधा


- जवळपास 75 लाख वर्गफिट परिसरात गार्डन, जॉगिंग ट्रॅक, ओपन थिएटर, टॉयलेट आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.