Lonavala Pawana Dam : परीक्षा संपवल्यामुळ सध्या अनेकजण पिकनीकचा (Lonavala Picnic) बेच आखत आहेत. मुंबईतील 18 जणांच्या ग्रुपने लोणावळा येथे पिकनीक आयोजीत केली होती. मात्र, या पिकनीकचा अत्यंत धक्कादायक अनुभव या ग्रुपला आहे. या ग्रुपमधील एक तरुणाला लोणवळा येथील पवना डॅममध्ये (Pawana Dam) बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईवरून 18 जणांचा ग्रुप लोणावळा येथे पिकनीकसाठी आला होता. लोणावळ्यात फिरल्यानंतर या ग्रुपने मावळातील पवना धरण परिसरात फिरायला जाण्याचा बेत आखला. यातील एका तरुणाचा पवना धरणाच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांना पाचारण करण्यात आले. 


कोण आहे हा तरुण?


साहिल विजय सावंत असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबईतील एका कॉलनीमध्ये राहणारे 9 तरुण आणि 9 तरुणींचा ग्रुप  रविवारी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. लोणावळा परिसर फिरून झाल्यानंतर ते पवना धरण परिसर फिरण्यासाठी आले. यावेळी पवना धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरले असता त्यापैकी साहिल याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.


लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी


सुट्ट्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट इथे राज्यातल्या कोनाकोप-यातून पर्यटक येत आहेत.  लोणावळा हे मुंबई पासून तासा दोन तासांच्या अंतरावर असल्याने पर्यटक  मोठ्या संख्येने येथे येत असतात.


कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू


साताऱ्यातील चोरगेवाडी येथे कन्हेर धरणात तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. स्वराज माने असेच बुडालेले तरुणाचे नाव असून तो अकलूज वेलापुर येथील आहे. तो मित्रांसोबत फिरायला आला असताना ही घटना घडली आहे. आ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि सातारा पोलीस या बुडालेल्या मुलाचा शोध घेत आहे.